ठेवीदारांच्या तक्रारींनंतर डीएसकेंच्या घर-कार्यालयात पोलिसांची झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 12:57 PM2017-11-02T12:57:13+5:302017-11-02T12:57:52+5:30
पुणे, ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात ...
पुणे, ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठेवीदारांनी तक्रार केल्यानंतर गुरुवारी (2 नोव्हेंबर) पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेनं डी.एस.केंच्या पुणे शहरातील 4 व मुंबईतील एका ठिकाणावर छापा मारला.