पुणे : शहरातील महापालिकेच्या ११९ केंद्रांवर आज (मंगळवार दि. २९ जून) कोव्हिशिल्ड तर महापालिकेच्या ५८ दवाखान्यांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील वर्गाला केवळ ऑनलाईन बुकिंगव्दारे कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे़ दरम्यान आजही १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार असून, ज्यांनी ३१ मे पूर्वी पहिला डोस घेतला आहे, अशांना ५० टक्के लस ऑनलाईन बुकिंगव्दारे तर ५० टक्के लस ही आॅन दी स्पॉट उपलब्ध असेल. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. याव्दारे ६ एप्रिलपूर्वी कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना ३० टक्के लस दुसरा डोस ऑनलाईन बुकिंगव्दारे घेता येणार आहे़ तर ३० टक्के लस ही हेल्थ केअर वर्कर, फ्रं ट लाईन वर्कर व ४५ वर्षेवयावरील नागरिकांना ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळणार आहे़ तसेच २० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंग केलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस म्हणून व उर्वरित २० टक्के लस ही हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ४५ वर्षेवयावरील नागरिकांना पहिला डोस म्हणून सर्व केंद्रांवर दिली जाणार आहे.----