अशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 10:31 PM2018-05-21T22:31:38+5:302018-05-21T22:32:41+5:30
पुणे - पुणे शहराजवळीत पिरंगूट घाटातील म्हसोबा देवाच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या चोरीचे सीसीटीव्ही ...
पुणे - पुणे शहराजवळीत पिरंगूट घाटातील म्हसोबा देवाच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यानुसार पोलिसांचा तपास सुरु झाला आहे. रविवारी (20 मे) ओजी रात्री 2.45 ते 3.25 च्या सुमारास या मंदिरात चोरी झाली. यात देवाचे दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला आहे.या घटनेबद्दल गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडण्याची मागणी करण्यात येत होती. तपास करताना ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलिसांना आढळले आहे. या फुटेजमध्ये सुरुवातीला खिडकीच्या मार्गाने एक चोर मंदिरात प्रवेश करताना दिसतो. त्याला बाहेरून दुसरा चोर मदत करताना दिसतो. मात्र काही काळाने ती व्यक्तीही मंदिरात प्रवेश करून दानपेटीची चाचपणी करताना दिसते. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.