धनंजय देसाईची जामिनावर सुटका; समर्थकांची पुण्यात रॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 06:41 PM2019-02-09T18:41:58+5:302019-02-09T18:44:49+5:30
पुण्यातील आयटी अभियंता मोहसीन शेख याच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर आज त्याची येरवडा कारागृहातून जामीनावर सुटका करण्यात आली.
पुणे - पुण्यातील आयटी अभियंता मोहसीन शेख याच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर आज त्याची येरवडा कारागृहातून जामीनावर सुटका करण्यात आली. यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे शेकडो कार्यकर्ते त्याला घ्यायला येरवडा कारागृहाजवळ जमा झाले होते. त्यानंतर शहरात भगवे झेंडे घेऊन रॅली काढण्यात आली.