काँग्रेसमुळेच अधिवेशनाचा अमूल्य वेळ वाया गेला, असा भाजपचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील भाजपाच्या खासदार आणि आमदारांकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरासमोर उपोषणासाठी भाजपाचे नेते जमले होते. यामध्ये बाळा भेगडे व भीमराव तापकीर यांचाही समावेश होता. सुरूवातीचा काहीवेळ उपोषणस्थळी हजेरी लावल्यानंतर हे दोघेही जलयुक्त शिवार व खरीप नियोजनाच्या सरकारी बैठकीसाठी गेले. त्याठिकाणी बैठकीच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे खाण्यासाठी सँडविच, वेफर्स आणि मिठाई टेबलावर ठेवण्यात आली. तेव्हा मात्र बाळा भेगडे आणि भीमराव तपकीर यांना उपोषणाचा विसर पडला आणि त्यांनी सँडविच, वेफर्स व मिठाईवर ताव मारायाल सुरुवात केली.