पुणे : आपण आत्मघातकी बॉम्बर असल्याच्या बातम्या वाचल्या नंतर मी स्वतः पोलिसाकडे गेले. सर्व तपास यंत्रणा नी माझ्याकडे तपास केला , त्यांना तसे काहीही आढळून न आल्याने त्यांनी मला माझ्या आईकडे सुपूर्त केले असल्याचे सादिया शेख हिने सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रजासत्ताक दिनी जम्मू- काश्मीरमध्ये घातपात घडवण्यासाठी आली असल्याचे गुप्तचर यंत्रणांना सांगण्यात आले होते. यानंतर जम्मू -काश्मीर पोलिसांनी २५ जानेवारी रोजी दक्षिण काश्मीरमधून सादिया शेख हिला ताब्यात घेतले होते. पण, ती कुठल्याही दहशतवादी संघटनेशी संबंधित नसल्याचे समोर आले आहे.