पुणे : योग दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील बालगंधर्व रंगमंदिराजवळील नांदे तलावात पाण्यातला अर्थात ऍक्वा योगाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. चैताली ठोंबरे, निधी घोरपडे, लौकीका माळगे, मनिषा कर्डीले या युवतींनी पाण्यामध्ये योगासने सादर केली. त्याच वेळी तलावाच्या बाजूने सुमारे १०० विद्यार्थ्यांनी बाहेर योगासने सादर करत त्यांना साथ दिली. ताडासन, नटराजासन, वीरभद्रासन, पतंगासन, पवन मुक्तासन अशा वैविध्यपूर्ण आणि तितक्याच कठीण अशा आसनांचे सादरीकरण पाण्यामध्ये करुन या योगप्रेमी युवतींनी सशक्त भारताचा संदेश दिला.