Next

पर्यटकांसाठी खुशखबर, लोणावळ्याचा भुशी डॅम ओव्हरफ्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 10:54 PM2019-07-01T22:54:51+5:302019-07-01T22:54:58+5:30

लोणावळा  :  लोणावळा  शहरातील पावसाळी पर्यटनांचे आकर्षण बिंदू असलेले भुशी  धरण  आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले.  धरण ...

लोणावळा  :  लोणावळा  शहरातील पावसाळी पर्यटनांचे आकर्षण बिंदू असलेले भुशी  धरण  आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले.  धरण  फुल होऊन सांडव्यावरुन पाणी वाहू लागल्याने परिसरातील व्यावयिकांनी एकच जल्लोष केला.तब्बल तीन आठवडे उशिराने सुरु झालेल्या मॉन्सूनने अवघ्या चार दिवसातच भुशी धरण ओव्हरफ्लो झाले. तीन दिवसात शहरात ४५६  मिमी पावसाची नोंद झाली आहे.