पुणे - मेट्रोच्या कामाकरिता आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण असताना पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. येत्या 17 तारखेला मोदी यांची पुण्यात सभा आहे. टिळक रस्त्यावरील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा पार पडणार आहे. त्याकरिता व्यासपीठाच्या जवळील आणि सुरक्षेला अडथळा निर्माण करणारी झाडे कापण्यात आली आहेत. यात साधारण 20 झाडांचा समावेश आहे.