Next

सातारा रोडवरील शिंदेवाडी येथे शिवशाहीसह 10 बस जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 15:58 IST2019-03-20T15:57:45+5:302019-03-20T15:58:41+5:30

पुणे-सातारा रोडवरील शिंदेवाडी येथील एका गॅरेजमध्ये बुधवारी (20 मार्च) भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे  -   पुणे -सातारा रोडवरील शिंदेवाडी येथील एका गॅरेजमध्ये बुधवारी (20 मार्च) भीषण  आग  लागल्याची माहिती समोर आली आहे. या  आगीत शिवशाही  बससह 10 खासगी गाड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे -सातारा रोडवर शिंदेवाडी येथे बसचे बॉडी बांधण्याचे काम चालते. या गॅरेजमध्ये बुधवारी सकाळी अचानक आग लागली.