- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : एकीकडे झिंगाटसारखं उडत्या चालीचं गाणं तर दुसरीकडे जा तोसे नहीं बोलूं कन्हैया सारखे लयबद्ध गीत....दोन्ही गाण्यांवर तेवढ्याच उत्साहाने नृत्य करणा-या पुण्याच्या सुशीला आज्जी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ऐंशी वर्षांच्या या आजींच्या नृत्याच्या व्हिडीओला तीन दिवसांत १२ लाख व्ह्यूज मिळाले असून, हजारो शेअर तर लाखो लाईक्स आणि कमेंटसचा अक्षरश: पाऊस पडत आहे.