बारामती : लस घेवूनही आपणाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आणि उपचारासाठी बेड मिळणार नाही या भीती पोटी वृद्धाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. शनिवारी (दि.24) रात्री ही घटना भिगवण येथे घडली.याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश विष्णुपंत भगत (वय ६५ ) असे गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. भगत यांनी ८ दिवसापूर्वी कोरोना लस घेतली होती.लस घेतल्यापासून त्यांची तब्येत ठीक नव्हती . सर्दी खोकला आणि अंगदुखी सारखा किरकोळ आजार होता. चार दिवस होवूनही आराम मिळत नसल्यामुळे घरातील इतर सदस्यांनी त्यांना कोरोना चाचणी घेण्यासाठी सांगितले.मात्र आपली कोरोना चाचणी पॉसिटीव्ह आली तर आपल्याला उपचार मिळतील का ,बेड मिळेल का या काळजीने २४ एप्रिल रोजी रात्री जेवण झाल्यानंतर सर्व सदस्य झोपले असता त्यांनी स्वयपाकघरात जात पंख्याला गळफास घेतला. लस घेतली असताना आपणाला कोरोना कसा झाला याच विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पावूल उचलले असल्याची चर्चा होत आहे.याबाबत दतात्रय प्रकाश भगत यांनी भिगवण पोलीस ठाण्यात खबर दिली असून भिगवण पोलीस पुढील तपास करीत आहेत .याबाबत बोलताना भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने म्हणाले, कोरोना बरा होणारा आजार असून तपासणी पॉझिटिव्ह आली म्हणून घाबरून जावून टोकाचा विचार न करता उपचार घ्यावेत असे सांगितले.------------------------