Next

पावसाळी पर्यटनाने मुळशीमध्ये गर्दी

By lokmat news network | Published: July 26, 2017 05:18 PM2017-07-26T17:18:51+5:302017-07-26T17:22:28+5:30

मुळशी तालुका आणि पावसाळी पर्यटन हे एक समीकरणच झालं आहे.

पुणे, दि. 26 - मुळशी तालुका आणि पावसाळी पर्यटन हे एक समीकरणच झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुळशीतील धबधबे खळाळू लागले आहेत. निसर्गाने हिरवा शालू परिधान केला असून सर्वत्र धुक्याची दुलई पसरली आहे. निसर्गाचे हे विहंगम दृष्य नजरेत टिपण्यासाठी आणि पावसामध्ये भिजण्याची मजा लुटण्यासाठी मुळशीमध्ये पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणींपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वचजण भिजण्याचा आनंद लुटत आहेत. विशेष म्हणजे कौटुंबिक सहलींसाठीही मुळशीला प्राधान्य दिले जात आहे. पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या ताम्हीणी घाट, पळसे धबधबा, पौड, डोंगरवाडी, मुळशी धरण आदी भागांमध्ये पर्यटकांची गर्दी होत आहे. केवळ पर्यटकच नाही तर प्रोफेशनल टेकर्सही मोठ्या प्रमाणावर मुळशीकडे आकर्षित होत आहेत. विविध ठिकाणी टेक्स आयोजित करण्यात येत आहेत.

टॅग्स :