ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत, तिथे ज्याची सीट त्याला मिळाली. त्यामुळे हे उपकार नाहीत, तो हक्क आहे. हे सगळं उभं करताना दिवसरात्र स्ट्रगल करावा लागतो, असं ठाम मत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. अर्थात, पक्षप्रमुखांचे आशीर्वाद नक्कीच आहेत, कारण कुणाला तिकीट द्यायचं याचा अधिकार त्यांना आहे आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे, असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.