Next

भाईचा बड्डे खतरनाक ..... पण थेट जेलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 13:56 IST2019-02-27T13:50:46+5:302019-02-27T13:56:23+5:30

पुणे - विश्रांतवाडी पोलिसांनी  वाढदिवसाचा केक तलवारीने कापणाऱ्या दोन भाईंना तलवारीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. या भाईंना न्यायालयाने अशा वाढदिवसाची भेट ...

पुणे - विश्रांतवाडी पोलिसांनी  वाढदिवसाचा केक तलवारीने कापणाऱ्या दोन भाईंना तलवारीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. या भाईंना न्यायालयाने अशा वाढदिवसाची भेट म्हणून थेट कारागृहात रवानगी केली. रोहित दिपक ठोंबरे (वय 21, मुंजाबावस्ती धानोरी) व नितेश बाबासाहेब सरोदे (वय 19,बर्मासेल लोहगाव) या  दोघांना पेट्रोलिंग दरम्यान विश्रांतवाडी पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेतले. अधिक तपासात नितेश याने रोहित याच्या वाढदिवसासाठी तलवार आणून याच तलवारीने केक कापून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना बेकायदेशीर घातक शस्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.