वेतनवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी सोमवारी (16 ऑक्टोबर ) मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील आंदोलनकर्त्या एसटी कर्मचा-यांची भेट घेतली. त्यांच्या मागन्या व बसस्थानकवरील सोयीसुविधा व अडचणींची माहितीदेखील यावेळी त्यांनी घेतली.