सियाचीनमधील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सुमेधा चिथडेंनी मोडले दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 07:43 PM2018-04-16T19:43:07+5:302018-04-16T19:43:32+5:30
पुण्यातल्या सुमेधा चिथडेंनी याच प्रकारे आपले दागिने मोडून सियाचीनमध्ये तैनात सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मदत करत नवा पायंडा पडला ...
पुण्यातल्या सुमेधा चिथडेंनी याच प्रकारे आपले दागिने मोडून सियाचीनमध्ये तैनात सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मदत करत नवा पायंडा पडला आहे. चिथडे या स्वतः त्यांचे वायुदलातून निवृत्त झालेले पती योगेश चिथडे यांच्यासह १९९९पासून सोल्जर्स इंडिपेन्डन्ट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन ही संस्था सुरु केली. या संस्थेच्या मार्फत शहीद जवानांच्या कुटुंबियांना मानसिक आधार देणे, वीरपत्नींना शिक्षण देणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करणे, जवानांना फराळ पाठवणे, राखी पाठवणे आणि तरुणांमध्ये लष्करी सेवेचे पर्याय मांडणे अशी विविध कामे केली जातात. त्यात सियाचीन येथे अतिशय थंडीत देशाच्या संरक्षणासाठी दिवस रात्र उभ्या असणाऱ्या जवानांसाठी ऑक्सिजन प्लांट उभा करण्याचा संस्थेचा मानस आहे. यासाठी सुमारे १ कोटी १० लाख रुपये इतका खर्च येणार आहे. यासाठी मदतीची गरज असून सुमेधा यांनी स्वतःपासून सुरुवात केली आहे.