केवळ तृतीयपंथी आहे म्हणून प्रवेश नाकारण्याची घटना पुण्यातील फीनिक्स मॉलमध्ये घडली आहे. आत कार्यक्रमासाठी आले आहे असं वारंवार सांगूनही सुरक्षा रक्षकांनी सोडले गेले नसल्याचा अनुभव उच्चशिक्षित तृतीयपंथी सोनाली यांना आला. मित्रासह गुढीपाडव्यानिमित्त खरेदीसाठी गेलेल्या सोनाली यांना सुरक्षारक्षकांनी मॉलमध्ये प्रवेश नाकारला.