पुणे : आता दोन राजीनामे झाले असून लवकरच तिसरा ही घेऊ असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. यानंतर राजीनाम्याची रांग लागेल असंही ते म्हणाले. पुण्यामध्ये आज भाजपच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना पाटील म्हणाले,' कोणीतरी म्हणालं की 36 दिवसात दुसरी विकेट. पण आता दुसरीच नाही तर तिसरी, चौथी अशा विकेट ही जाणार आहेत. तिसरी विकेट तर आठवड्यातच जाणार आहे. आणि पहिले काही काय झाले की पुढच्या विकेट आणखी सोप्या होनार असून त्या नंतर त्यांची रांगच लागेल.'दरम्यान तिसरा राजीनामा नेमका कोणाचा याबाबत विचारल्यावर पाटील म्हणाले ' एकाच्या दोन बायकांचा प्रकार उघडकीला आला आहे. दुसऱ्याचे मारहाणीचे प्रकरण कोर्टात आहे. आम्ही आंदोलन करूच..तुम्हाला कळेल पुढे कोण ते .'दरम्यान छत्तीसगड येथील हल्ल्याचा उल्लेख करत पाटील यांनी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात देखील नक्षलवादी स्लीपर सेल चे लोक घुसले आहेत. पुढचा काळात खूप मोठी वैचारिक लढाई होणार आहे.