ती आली, तिने पहिले आणि तिने जिंकले अशी स्थिती पुण्यात रविवारी झालेली बघायला मिळाली. भारतमाता की जय, जय शिवाजी जय भवानी, वंदे मातरम् या घोषणांनी रविवारी पुणे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुवर्ण व रौप्यपदकविजेत्या नेमबाज तेजस्विनी सावंतचे जल्लोषात स्वागत झाले. यावेळी तिची एक झलक टिपण्यासाठी शेकडो कॅमेरे लखलखत होते. घरच्यांचा व सहकाऱ्यांचा पाठिंबा आणि सरावादरम्यान केलेले योग्य नियोजन यामुळे गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकू शकले, असे ‘गोल्डन गर्ल’ तेजस्विनीने सांगितले.