पुणे येथील दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथील खडकाळ माळरानावर आयटी क्षेत्रात काम करणा-या माधव घुले या तरुणाने तब्बल 30 एकर खडकाळ जमिनीवर शेती फुलवली आहे. रासायनिक शेतीकडे न वळता घुले यांनी नैसर्गिक पद्धतींचा वापर करत यशस्वीरित्या शेती केली आहे. माधव घुले हा तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर असून गेल्या दोन वर्षांपासून झिरो बजेट शेती करत आहे. कृषीतज्ज्ञ सुभाष पाळेकर यांच्या तंत्रज्ञानानुसार नैसर्गिक शेती पद्धतीनं घुले यांनी येथे बाजरी, ऊस, शेवगा, तुर, मका, भुईमुग, केळी, गहू आदी सर्वच प्रकारच्या पिकांची यशस्वी शेती केली आहे.