रत्नागिरी - रत्नागिरीतील वस्तू व सेवा कार्यालयात झालेल्या महापुरुषाच्या प्रतिमा विटंबनाप्रकरणी पंधरा दिवस होऊनही कारवाई न झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी आज रत्नागिरीत ठिय्या आंदोलन केले. एवढे दिवस होऊनही आरोपी न सापडल्याने लोक आक्रमक झाले आहेत. पोलीस तसेच जिल्हा प्रशासनचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.