रत्नागिरी - राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय खात्याने 1 जून ते 31 जुलै या पावसाळी काळात मासेमारीला बंदी घातली आहे.या काळात समुद्र खवळलेला असतो,आणि विशेष म्हणजे माश्यांच्या प्रजोत्पादनाचा काळ असल्याने मासे या काळात मोठ्या प्रमाणात अंडी घालतात. त्यामुळे या बंदीचे राज्यातील मच्छिमार देखील कसोशीने पालन करतात.आणि राज्यातील मासेमारी संपूर्ण बंद असते.जर या आदेशाचे उल्लंघन करून मासेमारी केल्यास बंदर खाते मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई करते. पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत रत्नागिरीच्या समुद्रात 10 चीनी बोटी मासेमारी करत असून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली असल्याचा आरोप पर्ससेईन असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नखवा यांनी केला आहे. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी करावी अशी मागणी गणेश नाखवा यांनी केली आहे.