देवरूख : काजूगर घातलेलं मटण आणि भाकरी असा घराघरात शिजणारा नैवेद्य आणि अनेक दिवस अंगावर टिकून राहणारा रंग... केवळ रत्नागिरी जिल्हाच नाही तर राज्यभरात प्रसिद्ध असलेला संगमेश्वरची ग्रामदेवता जाखमातेचा शिंपणे उत्सव शुक्रवारी (दि.16) दरवर्षीच्याच दणक्यात पार पडला. या शिंपण्याची सांगता सायंकाळी फे-याने करण्यात आली. या उत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो भाविक सहभागी होऊन लाल रंगात न्हाऊन निघाले. (व्हिडीओ - सचिन मोहिते)