कोकणचं दर्शन घडवणारा 'जनशताब्दी एक्स्प्रेस'चा नवा डबा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 09:28 PM2017-09-18T21:28:22+5:302017-09-18T21:28:46+5:30
रत्नागिरी - पर्यटकांना प्रवास करताना कोकण पाहता यावा, इथले डोंगर- दऱ्या, वाऱ्यावर डोलणारी शेते, असंख्य छोटे मोठे धबधबे पाहता ...
रत्नागिरी - पर्यटकांना प्रवास करताना कोकण पाहता यावा, इथले डोंगर- दऱ्या, वाऱ्यावर डोलणारी शेते, असंख्य छोटे मोठे धबधबे पाहता यावेत यासाठी कोकण रेल्वेने जनशताब्दी एक्स्प्रेसला मोठाल्या काचेच्या खिडक्यांचा डबा जोडला आहे. आज हा डबा असलेली जनशताब्दी एक्स्प्रेस प्रथमच कोकण रेल्वे मार्गावर धावली. या डब्याच्या खिडक्या नेहमीपेक्षा मोठ्या आहेत. डब्याची अंतर्गत रचनाही आलिशान थाटाची करण्यात आली आहे. 'वातानुकुलीत टुरिस्ट कार' असे नाव या डब्याला देण्यात आले आहे. हा डबा पाहण्यासाठी आज अनेकजण स्थानकावर उपस्थित होते.