Next

रत्नागिरी : समुद्रातील आकर्षित करणारं अनोखं जग!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 01:38 PM2018-01-05T13:38:08+5:302018-01-05T13:48:10+5:30

रत्नागिरीतील समुद्राच्या पोटातलं विश्व आता तुम्हाला जवळून पाहायला मिळणार आहे. हर्षा स्कुबा डायव्हींगतर्फे मिऱ्या समुद्रकिनारी राबवण्यात येणा-या उपक्रमांतर्गत समुद्रातील अनोखं जग तुम्हाला अनुभवता येणार आहे. नाताळच्या सुट्टीत प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानं आता हा उपक्रम नियमित पद्धतीने सुरू करण्यात आला आहे.