रत्नागिरी : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी येथील महसूल कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सरकार दखल घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे महसूल कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले. गेली ३-४ वर्षे सरकार फक्त आश्वासन देत आहे. या मागण्यांच्या पुर्ततेबाबत निर्णय मात्र झालेला नाही. दरम्यान ३ ऑक्टोबरपासून सुरू झालेले पुरवठा कर्मचाऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे.