सांगली : अंकली (ता. मिरज) येथील कृष्णा नदीपुलावर गेल्या दोन दिवसांपासून शेमटी (मेप्लाय) कीटकांच्या झुंडीच्या झुंडी वाहनधारकांसमोर येत असल्याने अपघात होत आहेत. मृत कीटकांचा खच पडल्यामुळे पुलाचा रस्ताही निसरडा बनल्याने वाहनधारकांना कसरत करीत ये-जा करावी लागत आहे.