ग्रामदैवत श्री नागनाथ यात्रेनिमित्त सुमारे २०० हुन अधिक वर्षांची परंपरा असलेला लाकडी बगाडे पळविण्याचा सोहळा सोमवारी उत्साहात पार पडला. नागेवाडी येथे गुढीपाडव्यादिवशी ग्रामदैवत श्री नागनाथ देवाची यात्रा भरते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी लाकडी बगाडे पळविण्याचा सोहळा असतो. 15 ते 20 फूट उंच लाकडी बगडाला बैलजोडी जुंपून हे बगाडे पळविले जातात.