इस्लामपूर - गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात गाजत असणारा कथिक कडकनाथ कोंबडी खरेदी घोटाळ्याचे पडसाद आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सांगली जिल्ह्यात आहे. यावेळी महाजनादेश यात्रेदरम्यान कुंडल-सांगली रस्त्यावर मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर कडकनाथ कोंबड्या फेकल्या. स्वाभिमानी पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.