सांगली - कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने शहराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून शहरातील मुख्यबाजार पेठही पाण्याखाली आली. बाजारपेठेत कमरेपर्यंत पाणी साचलं असल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे.