‘आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी जावळी तालुक्यातील जमिनी कोणी लाटल्या? याचे उत्तर द्यावे, तुम्हाला मताधिक्क्य कमी भेटले म्हणून आमच्यावर राग काढू नका आणि अशा खासदार उदयनराजेंना पक्ष सांभाळणार असेल तर पक्षातून बाहेर पडण्याची परवानगी खासदार शरद पवार यांनी आम्हाला द्यावी,’ असा इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला आहे.