कुडाळ ( सिंधुदुर्ग ) : कुडाळ तालुक्यातील पाणीपातळी वाढण्यासाठी कुडाळ पंचायत समितीने शुक्रवारी तालुक्यात बंधारा दिवस जाहीर करीत शासकीय निधीचा वापर न करता केवळ लोकसहभाग व श्रमदानातून संपूर्ण तालुक्यामध्ये शुक्रवारी एकाच दिवशी ३७९ बंधारे बांधले असून, अशा प्रकारे एकाच दिवशी बंधारे बांधण्याचा उपक्रम राबविणारी कुडाळ पंचायत समिती ही राज्यातील एकमेव पंचायत समिती ठरणार आहे.