सिंधुदुर्ग, ओखी वादळाचा जोरदार तडाखा वेंगुर्लेला बसला असून बंदरात नांगरून ठेवलेल्या 7 फायबरच्या होड्या सोमवारी (4 डिसेंबर) रात्री अचानक समुद्राला आलेल्या उधाणामुळे बुडाल्या आहेत. यात मच्छिमारांचे सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.