सोलापूर : राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरूवारी सकाळी सोलापूर - पुणे असा इंटरसिटी रेल्वेने प्रवास केला. यावेळी सहकारमंत्र्यांनी प्रवाशांची मुक्त संवाद साधला. स्वत: एसीमधून प्रवास करणारे सहकारमंत्र्यांनी नॉन एसी डब्यात जाऊन तेथील प्रवाशांच्या जवळ मोकळया जागेत बसून त्यांच्याशी चर्चा केली.