सोलापूर - आज देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राष्ट्रध्वजाच्या रंगातील फुलांनी सजावट करण्यात आली आहे. देवाचा गाभारा, चौखांभी मंडप, सोलखंभी मंडप, आकर्षक भगव्या, पांढऱ्या, हिरव्या पाना फुलांनी सजवला आहे.