मराठा आरक्षणासंदर्भात सोलापुरात शुक्रवारी (4 मे) मागासवर्गीय आयोगासमोर जनसुनावणी प्रारंभ झाला. यावेळी समितीपुढे निवेदन देण्यासाठी आलेल्या अखिल भारतीय माळी महासंघाचे पदाधिकारी शंकरराव लिंगे तसेच अॅड. राजेंद्र दीक्षित यांच्या तोंडाला काळे फासून कपडे पाडण्यात आले. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं आहे.