भीमा नदीत जलसमाधीचा प्रयत्न, सोलापुरातील तरुणाने घेतली उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 13:03 IST2018-07-28T12:54:05+5:302018-07-28T13:03:49+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पंढरपूरच्या सुस्ते येथील एका तरुणाने भीमा नदीमध्ये जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला आहे.
सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पंढरपूरच्या सुस्ते येथील एका तरुणाने भीमा नदीमध्ये जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला आहे. सचिन शिगंण असं या तरुणाचं नाव असून त्याने भीमा नदीच्या पात्रात उडी मारली. मात्र तरुणाला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले असून उपचारासाठी त्याला तातडीने पंढरपूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.