डोंबिवली: श्री स्वामी समर्थ मठ, नांदीवली येथे स्वामींच्या मठात गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांनी अलोट गर्दी केली आहे. पहाटेपासून मठात गर्दी झाली असून मंगळवारी दुपारी ग्रहण असल्याने संध्याकाळी 4 च्या आत दर्शन व्हावे यासाठी भक्त रांगेत येऊन दर्शन घेत आहेत. मंडळाच्या संस्थापिका सुषमा लिमये, अध्यक्ष नित्यानंद घाटे, अध्यक्षा माधुरी घाटे आदींच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने यंदाही संपन्न होत आहे. मंडळाचे संस्थापक कै. भालचंद्र (अण्णा) लिमये यांनी या मंडळाची स्थापना केली असून स्वामी समर्थ जयंती उत्सव, गुरुपौर्णिमा, राम नवमी, हनुमान जयंती, दीपोत्सव, गुढीपाडवा यांसह असंख्य उपक्रम हिंदू परंपरेनुसार या ठिकाणी आवर्जून केले जातात.