Next

जितेंद्र आव्हाड यांनी घेतली मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 15:30 IST2019-08-22T15:28:29+5:302019-08-22T15:30:00+5:30

ठाणे - राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव ...

ठाणे - राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे कार्यकर्त्यांची भेट घेतली. राज ठाकरे यांना आज ईडी समोर चौकशी करता हजर झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतील म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ठाणे पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला बसवून ठेवले आहे. अशा मनसे कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड पोलिस ठाण्यात आले होते.