घोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 11:37 AM2018-05-22T11:37:05+5:302018-05-22T12:06:08+5:30
विशाल हळदे मुंबईसारख्या महानगरांची तहान भागवणारे शहापूर तालुक्यातील भातसा धरण. याच धरणाशेजारी असणाऱ्या डोंगरमाथ्यावरील पाड्यांवर राहणा-यांना मात्र घोटभर पाणी ...
विशाल हळदे मुंबईसारख्या महानगरांची तहान भागवणारे शहापूर तालुक्यातील भातसा धरण. याच धरणाशेजारी असणाऱ्या डोंगरमाथ्यावरील पाड्यांवर राहणा-यांना मात्र घोटभर पाणी मिळावे म्हणून जीवघेणी पायपीट करावी लागते. मे महिन्याच्या रखरखत्या उन्हातान्हात या गावांमध्ये येणा-या टँकरचे पाणी मिळवण्यासाठी महिलांसह चिल्ल्यापिल्ल्यांचीही गर्दी होते. घसा कोरडा पडलेल्या विहिरींतील पाषाणात एखादा पाझर फुटेल, या आशेने खोदकाम सुरूच असते. एखाद्या विहिरीत ओंजळभर पाणी दिसले तरी विहिरीत उतरण्याची कसरत दिसते.