बदलापूर आणि वांगणी दरम्यान पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवाशांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्यांच्या जेवणाची आणि वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले आहेत.