ठाण्यातील दिव्यांग मुलांचे हात गुंतलेत आकाश कंदील बनविण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 05:57 PM2017-10-10T17:57:17+5:302017-10-10T17:57:44+5:30
ठाणे : घरासमोरचा परिसर रोषणाईने उजळून टाकणारे रंगीबेरंगी आकाश कंदील बाजारात पाहायला मिळत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने विशेष मुले बनवित ...
ठाणे : घरासमोरचा परिसर रोषणाईने उजळून टाकणारे रंगीबेरंगी आकाश कंदील बाजारात पाहायला मिळत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने विशेष मुले बनवित असलेले इकोफ्रेंडली आकाश कंदील ठाणेकारांचे लक्ष वेधून घेत आहेत. विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट या शाळेतील दिव्यांग मुले इकोफ्रेंडली कंदील बनविण्यात गुंतली आहेत. शंभर - दोनशे नव्हे तर तब्बल एक हजार आकाश कंदील तयार करण्याचे लक्ष्य त्यांच्यासमोर आहे. या शाळेच्या मुख्याध्यापिका मीना क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हे कंदील बनविले जात असून शाळेतील 25 मुलांनी सहभाग घेतला आहे. (व्हिडिओ: प्रज्ञा म्हात्रे)