बदलापूर , वांगणी परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर -आणि वांगणी स्थानकांमध्ये अडकली आहे. या ट्रेनमध्ये सुमारे दोन हजार प्रवासी असून, प्रवाशांची सुटका करण्यासाठी एन डी आर एफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अडकलेल्या प्रवाशांकडून मदतीसाठी याचना करण्यात येत आहे.