राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंगळवारी ( 3 ऑक्टोबर ) कळवा रेल्वे स्थानकात रेल रोको केला जाणार आहे. एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेला प्रशासन जबाबदार आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. खबरदारी म्हणून स्थानकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.