राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते आमदार अजित पवार यांनी भाजी पोळीची चव घेण्यासाठी चक्क डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा डाएट प्लॅन मोडला. कार्यकर्त्यांवरील प्रेमापोटी अजित पवारांनी भाजी पोळीचे दोन घास आपल्या पोटात टाकले. बदलापूर येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 'ताईज किचन' नावाने भोजनालय सुरू केले आहे. त्यामध्ये अत्यल्प किमतीत पोटभर जेवण दिले जाते.