ठाणे महानगर पालिकेच्या दंत चिकित्सा कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वर्तकनगरमधील महापालिका शाळेत आले होते. यावेळेस त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळेस त्यांना प्रशांत किशोर (जेडीयूचे उपाध्यक्ष ) यांच्यासोबतच्या भेटीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळेस ते म्हणाले की, आमचे दाखवायचे आणि खायचे दात एकच आहेत,असे म्हणत त्यांनी भाजपाला टोला हाणला.