हंसराज अहिरांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 13:40 IST2019-09-26T13:40:03+5:302019-09-26T13:40:30+5:30
माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या काफिल्यातील सुरक्षा रक्षकांचे भरधाव वाहन कंटेनरवर आदळल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले.
माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या काफिल्यातील सुरक्षा रक्षकांचे भरधाव वाहन कंटेनरवर आदळल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. चंद्रपूरहून नागपूरला गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास जात असताना जामजवळच्या कांडळी नदीजवळ हा भीषण अपघात झाला. अहीर यांचे वाहन पुढे निघून गेल्याने ते या अपघातातून बचावले. https://www.facebook.com/lokmat/videos/333801674074432/