वर्धा : 'मेरीट बचाओ... देश बचाओ' असा नारा देत वर्धा शहरातील रामनगर भागातील अनेकान्त स्वाध्याय मंदिर येथून रविवारी सकाळी ८.३५ वाजता विविध जाती-धर्मियांनी एकत्र येत मोर्चा काढला. या आंदोलनादरम्यान केवळ ५० टक्के आरक्षण कायम राहू द्यावे अशी प्रमुख मागणी करुन ५० टक्केच्या वर देण्यात येणाऱ्या आरक्षणाला विरोध दर्शविण्यात आला.