सजग नागरिकांमुळे वाचला आठ कासवांचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 20:07 IST2018-07-07T20:07:23+5:302018-07-07T20:07:32+5:30
बोर्डी- पालघर जिल्ह्यातील डहाणू किनाऱ्यावर शनिवार, 7 जुलैच्या दुपारपर्यंत पारनाका (1), चिखले (3) आणि घोलवड (2) तसेच शुक्रवारी चिंचणी येथेही दोन ...
बोर्डी- पालघर जिल्ह्यातील डहाणू किनाऱ्यावर शनिवार, 7 जुलैच्या दुपारपर्यंत पारनाका (1), चिखले (3) आणि घोलवड (2) तसेच शुक्रवारी चिंचणी येथेही दोन अशी एकूण आठ जखमी समुद्री कासवं आढळली. ती ऑलिव्ह रिडले जातीची असून त्यांच्यावर पारनाका येथील कासव पुनर्वसन केंद्रात उपचार सुरू आहेत. सजग नागरिकांमुळे या जीवांना वाचविण्यात यश आले आहे.